Tuesday, July 02, 2024 08:21:38 AM

ठाणेकरांची ‘डबल डेकर’ भरारी

ठाणेकरांची ‘डबल डेकर’ भरारी

ठाणे, ०९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी :टीएमटी प्रशासनाकडून गुरुवारच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांना डबल डेकर बस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात बस तिकिटात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ न करता परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी सन २०२३-२४चे ४२७ कोटी १९ लाखांचे सुधारित आणि सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे महसुली व भांडवली खर्चासह ६९४ कोटी ५६ लाख रकमेचे वास्तववादी व काटकसरीचे अंदाजपत्रक सभापती विलास जोशी यांना सादर केले.

गेल्या आर्थिक वर्षामध्ये नियोजित केलेल्या १२३ शून्य प्रदूषण असलेल्या इलेक्ट्रीक बसेसपैकी ११४ इलेक्ट्रिक बसेस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, उर्वरित बसेस लवकर दाखल होणार आहेत. याशिवाय नव्या आर्थिक वर्षामध्ये ‘पीएम ई-बस योजने’अंतर्गत १०० इलेक्ट्रिक बसेस व केंद्र सरकारच्या ‘एनसीएपी’अंतर्गत १५व्या वित्त आयोगानुसार ठाणे महापालिका परिवहन उपक्रमात ४२ आणि नवीन ४४ ई-बसेस ठाणे महापालिकेच्या सहकार्याने ताफ्यात दाखल केल्या जाणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात ठाणेकर प्रवासी नागरिकांना चांगल्या सुविधा व अधिक मार्गांवर मागणीनुसार बसेस देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


सम्बन्धित सामग्री