Saturday, October 05, 2024 03:10:48 PM

विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची महत्वाची भूमिका

विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची महत्वाची भूमिका

मुंबई, ७ जुलै २०२४, प्रतिनिधी : विकसित राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांची महत्वाची भूमिका आहे. विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांना योगदान देता यावे, त्यांचा सक्रीय सहभाग वाढवा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत @ २०४७ : Voice of Youth’ हा उपक्रम जाहीर केला आहे, असे राज्यपाल रमेश बैस म्हणाले. ते मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी असल्याचे राज्यपाल म्हणाले. तर मुंबई विद्यापीठाने जगात आपली ओळख निर्माण केल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० देशाच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे बनवले गेले आहे. या शैक्षणिक धोरणाने आकांक्षी उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि पुनर्रचना करण्यात आली आहे. विकसित भारतासाठी पुढील दहा वर्षांत विद्यापीठाला भारतातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान प्राप्त होईल यासाठी लक्ष्य निश्चित करावे, विद्यापीठ प्रशासकीय कामकाजात सुधारणा करून विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे प्रामाणिकपणे निराकरण करण्यासाठी प्रणाली विकसित करावी.गाव दत्तक प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे ,कौशल्य आधारित उद्योजकता आणि नवकल्पना प्रोत्साहन द्यावे अशा सूचनाही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केल्या.

  

सम्बन्धित सामग्री