मुंबई, ०६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वाढत्या वायू प्रदुषणाच्या तक्रारींसाठी संकेतस्थळ (वेब पोर्टल) आणि मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेला एका जनहित याचिकेच्या निमित्ताने दिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने एण्ड्रॉईडवर ‘मुंबई एअर’ नावाचे एक विशेष ऍप्लिकेशन विकसित केले आहे. मुंबईतील नागरिकांना या ऍप्लिकेशनचा वापर करून तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक विभागनिहाय तक्रार दाखल करण्याची सुविधा देखील ऍपमध्ये दिली आहे. प्रारंभी एण्ड्रॉईड प्लॅटफॉर्मवर हे ऍप्लिकेशन वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
‘मुंबई एअर’ ऍप
- गुगल प्ले स्टोअरवर 'मुंबई एअर' (Mumbai Air) ऍप्लिकेशन डाऊनलोड करा.
- ऍप इन्स्टॉल करताना सर्व परवानग्यांचा पर्याय क्लिक करा.
- मोबाईल नंबर साईन इन करण्यासाठी क्लिक करा.
- ‘एसएमएस’ द्वारे मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) दाखल करा आणि पडताळणी (व्हेरिफिकेशन) प्रक्रिया पूर्ण करा.
- युजर प्रोफाईलमध्ये वैयक्तिक माहितीचा भरणा करा.
महत्त्वाचे मुद्दे -
- वायुप्रदूषणाच्या तक्रारीसाठी बीएमसीचं 'मुंबई एअर' ऍप
- उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर पालिकेकडून ऍपची सुविधा
- ऍपच्या माध्यमातून प्रदूषणाबाबत तक्रार करता येणार