Thursday, July 04, 2024 09:36:36 AM

रुपारेल महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभागाचा अनोखा उत्सव

रुपारेल महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचा अनोखा उत्सव

मुंबई, ०५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : रुपारेल महाविद्यालयाच्या एन एस एस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी 'उमेद आशा जगण्याची' हा उत्सव आयोजित केला जातो. यावर्षीही ०३ आणि ०४ फेब्रुवारी रोजी उमेद हा उत्सव रुपारेल महाविद्यालयात पार पडला. या उत्सवात ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळते. यावर्षीही 'महाराष्ट्राची खाऊगल्ली' ही पाककला स्पर्धा, 'सूर तेच छेडिता ' ही गायन स्पर्धा, 'कर कमाल दे धमाल' हे मजेशीर खेळ तसेच उमेद किंग अँड क्वीन अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. नेहमीच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. पण रुपारेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून खास ज्येष्ठ नागरिकांसाठी उमेद हा उत्सव आयोजित करण्यात येतो.

महत्त्वाचे मुद्दे -

ज्येष्ठ नागरिकांसाठीचा 'उमेद ' आशा जगण्याची…
ज्येष्ठ नागरिकांना कलागुण सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ
रुपारेल महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभागाचा अनोखा उत्सव


सम्बन्धित सामग्री