Sunday, October 06, 2024 03:02:08 AM

ठाणे - बोरिवली दुहेरी भुयारी मार्गातील अडथळे दूर

ठाणे - बोरिवली दुहेरी भुयारी मार्गातील अडथळे दूर

मुंबई, ०४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महत्त्वाकांक्षी ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्याने भूमिपूजनातील मोठा अडथळा दूर झाला आहे. प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा प्रस्ताव ०६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्याच्या उच्चस्तरीय समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते १९ फेब्रुवारीला या प्रकल्पाचे भूमिपूजन होईल का असे विचारले असता महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की, राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीतीच याबाबत निर्णय होईल.

या प्रकल्पासाठी १६,६००.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचे कंत्राट हैद्राबादस्थित मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्वर्सला देण्यात आले आहे. हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बांधला जाणार आहे. त्यात १०.२५ किमीच्या दोन बोगद्यांचा समावेश आहे.

महत्त्वाचे मुद्दे -

  • ठाणे - बोरिवली दुहेरी भुयारी मार्गातील अडथळे दूर
  • प्रकल्पासाठी केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी
                 

सम्बन्धित सामग्री