Tuesday, July 02, 2024 08:17:41 AM

मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय?

मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय

  • नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या.
  • शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या.
  • कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा.
  • जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
  • आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा.
  • आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
  • SEBC अंतर्गत २०१४ च्या नियुक्त्या त्वरित द्या.
  • वर्ग १ आणि २ आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.
  • रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही.

सग्या सोयऱ्यांबाबत आद्यादेश नाही. तो सर्वात महत्वाचा आहे. आज रात्रीपर्यंत सग्यासोयऱ्यांचा आध्यादेश हवा आहे. आज रात्री अध्यादेश काढला नाही तर उद्या आझाद मैदानात जाणार. मी सकाळी ११ पासून उपोषण सुरु केलं आहे. आता पाणी देखील सोडून देईन. माझा मराठा समाज न्यायासाठी इथं आला आहे. जर आम्हाला काही केलं तर मुंबईत घुसू. जर काही झालं तर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने मुंबईचा दिशेने या. उद्या १२ पर्यंत अध्यादेश हवा नाहीतर आम्ही आझाद मैदानाच्या दिशेने निघणार आहोत. मला अध्यादेश हवा. शासन निर्णय आल्यानंतर तो वाचून समाजाला विचारुनच निर्णय घेतला जाईल. आम्ही ही वेळ दिली आहे, रात्रही दिली आहे. वकिल बांधवांशी दणादणा चर्चा करतो. आझद मैदानाबाबतचा निर्णय उद्या घेऊयात. आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही.


सम्बन्धित सामग्री