Tuesday, July 02, 2024 08:46:14 AM

जरांगे पाटलांची मोठी घोषणा

जरांगे पाटलांची मोठी घोषणा

मुंबई, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: १०० टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला १०० टक्के मोफत शिक्षण करावं अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. यावर मुलींना नर्सरी ते पद्युत्तर पर्यंत मोफत शिक्षण दिल्याचं सरकारने सांगितलं आहे. पण मुलांच्या शिक्षणावर काहीही भाष्य केलं नाही. आता त्यासंबंधी अध्यादेश सरकारने काढावा अशी मागणी आम्ही केली आहे.

आरक्षण मिळेपर्यंत भरती करायची नाही

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत भरती करायची नाही. जर भरती करायचीच असेल तर आमच्या जागा सोडून भरती करा अशी मागणी जरांगे यांनी केली. त्यासाठी शासन निर्णय काढावा. क्यूरिटिव्ह पीटीशन विषय सुप्रिम कोर्टात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना १०० टक्के मोफत शिक्षण द्यावं. ते आरक्षण मिळेपर्यंत ज्या सरकारी भरत्या होणार आहेत, ते आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाहीत आणि जर भरती करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवायच्या.

सर्व गुन्हे मागे घ्या

आंतवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यावी अशी मागणी जरांगेंनी केली होती. त्यावर गृहविभागाकडून तसे निर्देश दिल्याचे आम्हाला सांगितलं. पण त्यासंबंधी आपल्याला पत्र दिलं नाही. त्यामुळे ते पत्र मिळावं अशी मागणी आपण केली आहे. वंशावळ शोधण्याची समिती जी आहे त्यामध्ये जे काही अधिकारी असतील त्यांनी वेगानं काम करावं.


सम्बन्धित सामग्री