Tuesday, July 02, 2024 08:30:08 AM

जरांगेंचा वाशीतच मुक्काम

जरांगेंचा वाशीतच मुक्काम

मुंबई, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: सरकारने आपल्या सर्व मागण्यावर सकारात्मक असल्याचं सांगितलं, मग आम्ही एक पाऊल मागे घेतो, सरकारने एवढं म्हंटलं आहे तर मग आम्ही आझाद मैदानाकडे जाणार नाही, आजची रात्र इथेच काढतो, सरकारने आजच्या रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. उद्या दुपारपर्यंत अध्यादेश द्या, नाहीतर पुन्हा मुंबईकडे निघणार असा इशाराही त्यांनी दिला.

जो अध्यादेश आपण काढणार आहात त्यामध्ये मोफत शिक्षण, सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि सरकारी भरती केलीच तर आमच्या जागा राखीव ठेऊन करा. सरकारने या सर्व गोष्टींचा समावेश करावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

ज्या ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत त्यांच्या सर्व परिवाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी आपण सरकारकडे मागणी केली होती, ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. आतापर्यंत सापडलेल्या ५७ लाखांपैकी ३७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वितरित केल्याचं सरकारने सांगितलं असून त्याचा संपूर्ण डेटा आपण मागवल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं. तसेच शिंदे समिती बरखास्त करू नये, त्याचं काम सुरू राहू दे अशी मागणीही केल्याचं ते म्हणाले.


सम्बन्धित सामग्री