मुंबई एटीएसची बोरिवलीत कारवाई

मुंबई, ०७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. बोरिवली परिसरात एटीएसची मोठी कारवाई केली आहे. एटीएसने एललोरा गेस्ट हाऊसवर छापा टाकून ६ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून ३ शस्त्रे आणि ३६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मुंबईतील कस्तुरबा पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मोठा […]

मुंबई एटीएसची बोरिवलीत कारवाई

मुंबई, ०७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. बोरिवली परिसरात एटीएसची मोठी कारवाई केली आहे. एटीएसने एललोरा गेस्ट हाऊसवर छापा टाकून ६ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून ३ शस्त्रे आणि ३६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मुंबईतील कस्तुरबा पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मोठा घातापात टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी हे बोरिवली पूर्व येथे राहत होते. तसेच ते दिल्लीचे रहिवासी असल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची कसून चौकशी केली जात आहे. या आरोपींकडे शस्त्रे कशी आली ? यामागे नेमका कुणाचा हात आहे या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number