Monday, July 08, 2024 02:09:03 AM

मुंबईकरांच्या नशीबी पुन्हा 'पूलबंदी'

मुंबईकरांच्या नशीबी पुन्हा पूलबंदी

मुंबई, ०४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: मुंबईकरांना पुन्हा एकदा पुलबंदीचा सामना करावा लागणार आहे. सायन - धारावी - वांद्रे - माहिम या परिसराला जोडणारा सायन रेल्वे स्थानकासमोरचा ११० वर्ष जुना पुल लवकरच पाडला जाणार आहे. रेल्वेकडून पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाकरता सध्याचा पूल पाडून नवा पूल उभारण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेला देण्यात आला आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि धारावी, माहीम आणि वांद्रे यांना जोडणारा ११० वर्ष जुना सायन रेल्वे ओव्हरब्रिज हा महत्त्वाचा कनेक्टर आहे.

मध्य रेल्वे पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावरील पुलाची पुनर्बांधणी करत आहे. यासाठी सायन-धारावीचा हा पुल पाडला जाईल. मुंबई महापालिकेनं माहिमची जत्रा संपल्यानंतर म्हणजे ४ जानेवारीनंतर हा पुल बंद करण्याची परवानगी मध्य रेल्वेला दिली आहे. माहिमची जत्रा संपल्यानंतर नेमक्या कोणत्या दिवशी पूल बंद करायचा याचा निर्णय मध्य रेल्वेनं अद्याप घेतलेला नाही.


सम्बन्धित सामग्री