Sunday, July 07, 2024 10:12:43 PM

जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद

जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद

मुंबई, ०३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: जलवाहिनीच्या कामामुळे शहरासह उपनगरांतील पाणीपुरवठ्यावर दोन दिवस परिणाम होणार आहे. अनेक ठिकाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जलविभागाने केले आहे.

पवई येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी मुख्य वैतरणा जलवाहिनी ही समानीकरण बिंदू भांडुप संकुल ते मरोशी बोगद्यापर्यंत रिक्त करणे आवश्यक आहे. ही जलवाहिनी रिक्त करून दुरुस्ती करण्याचे काम गुरुवारी (ता. ४) सकाळी १० ते शुक्रवार (ता. ५) सकाळी १० पर्यंत २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. यामुळे कुर्ला, विक्रोळी भांडुप, मलबार हिल, आझाद मैदान, वांद्रे, महालक्ष्मी, चांदिवली, पवई आदी भागांत पाणीपुरवठा बंद राहणार असून काही भागांत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

कुर्ला, पवई चांदिवली अप्परतुंगा, लोअरतुंगा, मारवा, रहेजा विहार, चांदिवली फार्म रोड, साकी विहार रोड, साकीनाका, राम बाग रोड, चांदिवली फार्म रोड, नाहर अमृतशक्ती, आय.आर.बी. रोड, महिंद्रा क्वारी, विजय फायर रोड, संघर्ष नगर, खैराणी रोड, मोहिली पाईप लाईन रोड, भांडुप, विक्रोळी, कांजूर, म्हाडा जलवायू विहार, राणे सोसायटी, हिरानंदानी पवई, पंचकुटीर, तिरंदाज गावठाण, साईनाथ नगर, गोखले नगर, गरीब नगर, चैतन्य नगर, महात्मा फुले नगर, मोरारजी कंपाऊंड, रमाबाई नगर, हरिओम नगर, स्वामी नारायण नगर, गौतम नगर, इंदिरा नगर आदी भागात पाणीपुरवठा बंद राहील.

या ठिकाणी कपात

मलबार हिल आणि आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणाऱ्या ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्रांत गुरुवार ते शुक्रवारपर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. मलबार हिल आणि आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणाऱ्या ‘सी’ विभाग सँड हर्स्ट रोड परिसरात, एच/पूर्व, एच पश्चिम विभागातील सांताक्रूझ, वांद्रे, खार आदी भागांत, ‘डी’ विभागातील मलबार हिल, ग्रँट रोड, गिरगाव सर्व क्षेत्रात, रेसकोर्स टनेल शाफ्टमधून पाणीपुरवठा होणाऱ्या ई-विभागातील काळबादेवी परिसरात, जी/उत्तर व जी/दक्षिण विभागातील दादर, माहीम, धारावी माटुंगा आदी भागांत १० टक्के कपात करण्यात येईल.


सम्बन्धित सामग्री