Friday, March 28, 2025 12:33:36 AM

बेस्टच्या ताफ्यात ३,२०० बस

बेस्टच्या ताफ्यात ३२०० बस

मुंबई, ०३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: नव्या वर्षात बेस्टने आपल्या ताफ्यात ३२०० बसगाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बसची संख्या वाढवल्याने मुंबईतील प्रमुख अंतर्गत सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. बेस्टने भाडेतत्त्वावर आतापर्यंत १६८४ वातानुकूलित बस घेतल्या असून बेस्टचा एकूण ताफा २९७८ इतका झाला असल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली. लोकल सेवेनंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सर्वाधिक भार हा बेस्ट उपक्रमावर आहे. अशात बेस्टच्या मालकीच्या अनेक बसचे आयुर्मान संपल्याने त्या बाद करण्यात येत आहेत. परिणामी रस्त्यावरील बसची संख्या कमी झाली आहे. बेस्ट उपक्रमातील बसेसची संख्या २०२५ पर्यंत १९ हजार ६६२ इतकी वाढवण्यात येणार आहे; मात्र नव्या वर्षात ३२०० बस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री