Sunday, September 29, 2024 03:03:47 AM

फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान मुंबईत दाखल

फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान मुंबईत दाखल

मुंबई, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्रान्समध्ये थांबवलेलं रोमानियन विमान प्रवाशांसह मुंबईत दाखल झालं आहे. या विमानात ३०३ प्रवासी होते, त्यापैकी फक्त २७६ प्रवासी भारतात परतले आहेत. इतर प्रवाशांपैकी अनेकांनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला असून दोन प्रवाशांवर आरोपही दाखल करण्यात आले आहेत. भारत सरकारने या प्रकरणी फ्रान्स सरकारचे आभार मानले आहेत. फ्रान्समधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया ट्विटरवर पोस्ट करत लिहिलं आहे की, "परिस्थिती लवकरात लवकर सोडवल्याबद्दल फ्रेंच सरकार आणि वात्री विमानतळाचे आभार."

फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान मुंबईत दाखल
मानवी तस्करीच्या आरोपांमुळे फ्रान्समध्ये थांबवलेल्या विमानाने सोमवारी, २५ डिसेंबरला मुंबईसाठी उड्डाण केलं. मानवी तस्करीच्या संशयावरून शुक्रवारी २२ डिसेंबरला मुंबईला जाणारे विमान पॅरिसजवळील विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. या विमानात ३०३ प्रवासी होते, त्यात बहुतांश प्रवासी भारतीय होते. यातील भारतीय प्रवाशांसह २७६ प्रवाशांसह विमान भारतात दाखल झालं आहे. यामुळे भारत सरकारने फ्रान्स सरकारचे आभार मानले आहेत.

        

सम्बन्धित सामग्री