Tuesday, September 17, 2024 09:15:18 AM

मांजाने चिरला पोलिसाचा गळा

मांजाने चिरला पोलिसाचा गळा

वरळी, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पतंगाच्या मांजाने गळा चिरल्याने मुंबईतील एका ३७ वर्षीय पोलीस हवालदाराचा रविवारी दुपारी मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. घरी परतत असतानाच पोलीस हवालदारावर काळाने घाला घातला आहे. वाटेतच पोलीस हवालदाराचा गळा चिरला गेल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेनं पोलीस हवालदराच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीस कर्मचारी ड्युटी संपवून घरी परतत असताना पतंगाने गळा चिरल्याने मृत्यू झाला. मृत समीर सुरेश जाधव हे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला पुलावर असताना ही घटना घडली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. चायनीज मांजामुळे गळा चिरण्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. मात्र अशा घटनांनंतरही मांजाच्या विक्रीवर बंद झालेली दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा चायनीज मांजामुळे एका पोलीस हवालदाराला जीव गमवावा लागला आहे.

https://twitter.com/ANI/status/1738955854274265145?s=20

मिळालेल्या माहितीनुसार, समीर सुरेश जाधव असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वरळी येथील बीडीडी चाळीत कुटुंबासह राहणारे समीर जाधव हे दिंडोशी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून तैनात होते. रविवारी दुपारी समीर काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते. त्याचवेळी वाकोला पुलावरून जात असताना अचानक त्यांच्यासमोर पतंगाचा मांजा आला. मांजापासून वाचवण्याच्या प्रयत्नात असतानाच तो त्यांच्या गळ्यात अडकून पडला. त्यामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मानेतून रक्त वाहत असल्याचे पाहून समीरने स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात केला. या प्रयत्नात ते बाईकवरुन खाली पडले. तिथून जात असलेल्या एका वाहनचालकाने हा प्रकार पाहताच काही अंतरावर गस्तीवर उपस्थित असलेल्या खेरवाडी पोलिसांना याची माहिती दिली.


सम्बन्धित सामग्री