Sunday, April 06, 2025 07:12:30 PM

सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर

सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर

ठाणे, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला भोवलं आहे. कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ स्तरावर आदेश देऊनही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मानसिकता ठाणेकर यांनी दाखवली नसल्याने त्यांना ४५ दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या आतापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांबाबत सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. तर त्यांचा प्रभारी कार्यभार कार्यालयीन अधीक्षक सोपान भाईक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री