Friday, July 05, 2024 04:21:59 AM

आदित्य यांचा भाजपावर घणाघात

आदित्य यांचा भाजपावर घणाघात

मुंबई, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्याला पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असून कित्येक कोटींचा रस्ते घोटाळा झाला आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे मंत्री असताना आणि कोरोना काळात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यावर आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना लिहिलल्या पत्रांवर भाष्य केलं आहे.

स्ट्रीट फर्नीचर बाबत दोन आठवड्यांपूर्वी लोकायुक्तांना पत्र पाठवलं होतं, त्यांच उत्तर आलं आहे. मला आणि आयुक्तांना बोलावल आहे. अपेक्षा आहे आयुक्त येतील. सरकारने दावा केला होती की चौकशी सुरू आहे. पण त्याचं पुढे काय झालं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

भाजपच्या आमदाराने दावा केला होता की कंत्राट रद्द झाली. पण तरीही २०-२२ कोटी देण्यात आले आहेत. कंत्राट रद्द झाली असतील तर मग पैसे का दिले. एमटीएचएलच काम ८५ टक्के पूर्ण झाल होत. पण स्वतः च्या स्वार्थासाठी दिड महिना उशिर केला. त्यावेळी रोड घोटाळ्यात पालिकेने ४०० कोटी रुपयांची कंत्राटी रद्द केली. १००० हजार कोटी रुपयांहून अधीक पैसे वाचवले आहेत. मात्र गेल्या १ वर्षात १ एफडीआय चा पैसा राज्यात आला नाही. दिघा स्थानक ८ महिने झाले तय्यार आहे. पण उद्घाटनासाठी व्हीआयपी चा वेळ मिळाला नाही. दिल्लीश्वरांकडून लूट सूरू आहे. सूरत, अहमदाबाद गुजरातचे लोक त्यात सामील आहेत. मुख्यमंत्री भाजपची स्क्रिप्ट वापरत आहेत. त्यांची तेवढीच पोच आहे तेवढच ते करत आहेत.

'देश हुकूमशाहीकडे वळतोय'

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू झाली. निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत देखील आता सीजेआय नाही आहेत. संसदेच्या प्रकरणात सरकारला स्टेटमेंट देता आलं असतं. मात्र तसं झालं नाही. संसदेच्या प्रकरणाचं समर्थन नाही पण संसदेत घुसखोरी झालीच कशी याची चौकशी झाली नाही. ज्याच्या पासावर ते आले त्याची साधी चौकशी पण नाही. नोकऱ्या नाहीत म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं त्याचा देखील गांभीर्याने विचार करायला हवा. भाजपचा राममंदिराशी आतातरी काडीमात्र संबध नाही. २०१९ मध्ये कोर्टाच्या निर्णयामुळे मंदिर बनतं आहे.

महाराष्ट्र सगळ्यात भ्रष्ट राज्य झाला आहे. मुख्यमंत्री आता आईस्क्रीम पण टेंडर कोकोनट आईस्क्रीम खातात. फेब्रुवारीत विशेष अधिवेशन भरवणार आहे पण तोवर ते रहाणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


सम्बन्धित सामग्री