Saturday, July 06, 2024 10:59:23 PM

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय

मुंबई, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व मुंबई सागरी किनारा रस्त्यावर सहज प्रवेश करता यावा यासाठी मुंबई महापालिका चर्नी रोड आणि मरिन ड्राइव्हदरम्यान वाहनांसाठी दोन बोगद्यांची योजना आखत आहे. पालिकेकडून या प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता तपासली जात असून, त्यानंतर बोगदा बांधण्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.

सागरी किनारा मार्ग हा मरिन ड्राइव्ह ते वरळी-वांद्रे सी लिंक असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दक्षिण मुंबईतील वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच ३४ टक्के इंधन बचत आणि ७० टक्के वेळेची बचतही होणार आहे. मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क पहिला टप्पा, प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला दुसरा टप्पा आणि लोग्रो नाला ते वरळी सी लिंक असा तिसरा टप्पा असून, त्यांचे काम सुरू आहे. फेब्रुवारीत पहिला टप्पा आणि उर्वरीत काम मे, २०२४ पर्यंत काम पूर्ण करून किनारा मार्गावरील वाहतूक सुरू करण्याची योजना आहे. मरिन ड्राइव्ह उड्डाणपुलाच्या सिग्नलनंतर ५० मीटर अंतरावर सागरी किनारा मार्गावर वाहनचालकांना पोहोचता येईल व त्यानंतर वरळी सी लिंक गाठता येणार आहे.


सम्बन्धित सामग्री