Tuesday, July 02, 2024 09:12:54 AM

रेल्वे प्रवास होणार अधिक सुरक्षित

रेल्वे प्रवास होणार अधिक सुरक्षित

मुंबई, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अडचणीत असलेल्या व तातडीच्या मदतीची गरज असलेल्या महिला प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या ११७ स्थानकांतील फलाटांवर पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे. मुंबई विभागात सर्वप्रथम भायखळा स्थानकामध्ये हे बटन कार्यान्वित करण्यात आले आहे. महिलांसह सर्वच रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सध्या नावीन्यपूर्ण उपायांची चाचपणी करण्यात येत आहे.

रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व टॉकबॅक यंत्रणा बसविल्यानंतर आता फलाटांवर पॅनिक बटन कार्यान्वित करण्यात येणार आहे. '११७ रेल्वे स्थानकांतील प्रत्येक फलाटावर दोन पॅनिक बटन बसवण्यात येत आहे', असे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी सांगितले. यापैकी ७० रेल्वे स्थानके मुंबईतील आहेत. भायखळा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर महिला डबा येणाऱ्या ठिकाणी हे बटन कार्यान्वित करण्यात आले आहे. फलाटाच्या सीएसएमटीकडील बाजू आणि ठाण्याकडील बाजूला प्रत्येकी एक बटन आहे. बटन दाबताच तेथील सीसीटीव्ही कॅमेरा संबंधित व्यक्तीला हेरून त्याची हालचाल टिपतो. तसेच याची माहिती स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयासह रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळते, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


सम्बन्धित सामग्री