Wednesday, July 03, 2024 12:48:57 AM

पश्चिम रेल्वेचा मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत ब्लॉक

पश्चिम रेल्वेचा मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत ब्लॉक

मुंबई, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी मंगळवारी मध्यरात्री १.१० ते बुधवारी पहाटे ४.४०पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. अप-डाउन हार्बरसह अप-डाउन धीम्या-जलद मार्ग आणि पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

मंगळवारी रद्द राहणाऱ्या लोकल फेऱ्या

  • विरार - अंधेरी : रात्री १०.१८
  • वसई रोड - अंधेरी : रात्री ११.१५
  • चर्चगेट - विलेपार्ले : मध्यरात्री १२.३०

बुधवारी रद्द राहणाऱ्या लोकल फेऱ्या

  • अंधेरी - विरार : पहाटे ४.२५
  • वांद्रे - बोरिवली : पहाटे ४.०५
  • बोरिवली - चर्चगेट : पहाटे ४.५३
  • अंधेरी - विरार : पहाटे ४.४०
  • अंधेरी - चर्चगेट : पहाटे ४.०५

विलंबाने धावणाऱ्या लोकल

  • विरार - चर्चगेट : पहाटे ३.२५ (१० मिनिटे)
  • बोरिवली - चर्चगेट : पहाटे ४.०५ (१५ मिनिटे)
  • विरार - बोरिवली : पहाटे ३.३५ (१० मिनिटे)

सम्बन्धित सामग्री