Friday, March 28, 2025 12:33:35 AM

सोमवारी मुंबईत १० टक्के पाणीकपात

सोमवारी मुंबईत १० टक्के पाणीकपात

मुंबई, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबई महापालिकेतर्फे मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने आयआयटी पवईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती नेमली आहे. या समितीकडून १८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत या २ तासांच्या कालावधीत तज्ज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहेत. परिणामी शहरातील पाच वॉर्डात (ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभाग) १० टक्के पाणीकपात केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली.


सम्बन्धित सामग्री