Tuesday, July 02, 2024 08:25:24 AM

नववर्षी डबलडेकरची भेट

नववर्षी डबलडेकरची भेट

नवी मुंबई , १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: या महिनाअखेर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात १० इलेक्ट्रिक वातानुकुलित डबलडेकर बसगाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांनाही इलेक्ट्रिकल डबलडेकर बसमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे. सन २०२२पासून परिवहनच्या वतीने इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी प्रयत्न सुरू होते. त्यानुसार, या बसगाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या १० इलेक्ट्रिक बसगाड्यांची खरेदी करण्यात आली आहे.

ही बस पर्यटनाच्या दृष्टीने शहरात फिरवून तिला कसा प्रतिसाद मिळणार, याचा अंदाज घेतला जाणार होता. त्यानुसार अन्य १० बसगाड्याखरेदीचा विचार केला जाणार होता. फेब्रुवारीमध्ये मुंबईत पहिली इलेक्ट्रिक डबलडेकर बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली.

दहापैकी पहिली बस २०२२ वर्षअखेर दाखल होणे अपेक्षित होते, मात्र २०२३ डिसेंबर महिना संपत आला तरी अजूनही पहिली बस एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झालेली नाही. त्यातच मुंबईमध्ये इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल झाल्याने आणि त्यातून प्रवासही सुरू झाल्याने नवी मुंबईकरांचेही लक्ष या ‘डबलडेकर’कडे लागले आहे. मात्र उशीर झाल्याने एनएमएमटी प्रशासनाने दहा बसगाड्या एकाच वेळी खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यानुसार या डिसेंबर महिनाअखेर १० बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.


सम्बन्धित सामग्री