Saturday, October 05, 2024 03:18:10 PM

भिवंडीत ओबीसी मेळावा

भिवंडीत ओबीसी मेळावा

भिवंडी, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत, तसेच कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली शिंदे समिती तत्काळ रद्द करावी या मागणीसाठी राज्यभरात ओबीसी मेळावे होत आहे. दरम्यान रविवारी (१७ डिसेंबर) रोजी ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव येथे ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या सभेत छगन भुजबळ नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, एकीकडे आंतरवालीत मराठा समाजाची बैठक होत असून, दुसरीकडे ठाण्यात भुजबळांची ओबीसी सभा होत आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नयेत यासाठी भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांच्याकडून राज्यभरात ओबीसी सभा देखील घेतल्या जात आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव येथे ओबीसी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला भुजबळ यांच्यासह अनेक महत्वाचे ओबीसी नेते हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्याकडून सतत भुजबळ यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे आजच्या सभेतून भुजबळ जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री