Monday, July 01, 2024 03:30:51 AM

गतिरोधकांचा वाहनांना फटका

गतिरोधकांचा वाहनांना फटका

नवी मुंबई, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: ठाणे बेलापूर मार्गांवर ऐरोलीकडे जात असताना मनपातर्फे अपघाताला आमंत्रण देण्यात आले आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण वेगावर मर्यादा आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टेच मारले नसल्याने वाहनचालकांना गतिरोधकाचा अंदाज येत नाही. यामार्गांवरून वाहने वेगाने जात असून गतिरोधक दिसण्यात येत नसल्याने या गतिरोधकावर वाहने जोरात आदळत आहेत. अचानक वाहनासमोर गतिरोधक येत असल्याने वाहनाचा तोल जाऊन अथवा अचानक ब्रेक दाबल्याने अपघात होण्याची दाट शक्यता असून याठिकाणी तात्काळ पांढरे पट्टे मारण्यात यावे अशी मागणी करण्यात येते आहे.


सम्बन्धित सामग्री