Sunday, June 30, 2024 10:15:19 AM

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

मुंबई, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी संध्याकाळी मुंबईत हृदयविकाराचा झटका आला. ४७ वर्षीय श्रेयसने संपूर्ण दिवस शुटींग केली आणि त्यानंतर तो हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर श्रेयसला त्वरीत अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेण्यात आले.

श्रेयस तळपदे दिवसभर शुटींगमध्ये व्यस्त होता. तिथे त्याची प्रकृती ठीक होती. “त्याने दिवसभर चित्रीकरण केले, तो पूर्णपणे ठीक होता. त्याने थोडेसे अॅक्शन सीक्वेन्सही शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले पण तो वाटेतच कोसळला.” या प्रकरणी रुग्णालयाने सांगितले की, "श्रेयस तळपदे रुग्णालयात दाखल आहे. त्याला संध्याकाळी उशिरा आणण्यात आले. आज १० वाजण्याच्या सुमारास त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. तसेच आता अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.


सम्बन्धित सामग्री