Friday, July 05, 2024 03:13:13 AM

गोखले उड्डाणपुलाच्या कामाला वेग

गोखले उड्डाणपुलाच्या कामाला वेग

मुंबई, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर टाकण्याचे काम झाले आहे. उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. अंधेरीच्या पूर्व आणि पश्चिमेकडील भागाला जोडणारा गोखले उड्डाणपूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. यामुळे या पुलाच्या कामाकडे अनेकांचे लक्ष आहे.

अंधेरी पूर्व - पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाचा पहिला गर्डर बसवण्याचे काम शनिवारी मध्यरात्री पार पडले. फटाक्याची आतषबाजी करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जय श्रीरामचे नारे देत एकमेकांचे अभिनंदन केले. या पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरीतील एक महत्त्वाचा पूर्व - पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आहे. मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी मध्यरात्री गोखले पुलाच्या गर्डर्सची ट्रायल रन यशस्वी केली. यानंतर शनिवारी मध्यरात्री गर्डर स्थापित करण्यासाठी विशेष चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

गोखले उड्डाणपुलासाठी दोन गर्डर टाकणार. गर्डरचे एकूण वजन १२७५ टन

पुलाची लांबी रेल्वे भूभागात ९० मीटर

रेल्वेबाहेर पूर्वेला २१० मीटर, पश्चिमेला १८५ मीटर

पुलाची रुंदी रेल्वे भूभागात १३.५ मीटर

रेल्वेच्या पूर्व व पश्चिमेस दोन्ही बाजूस पोहोच रस्ते, फुटपाथ १२ मीटर

एकूण रुंदी २४ मीटर

गर्डर टाकल्यानंतर त्यावर सळया अंथरून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येईल. नंतर १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत एक बाजू वाहतुकीसाठी सुरू केली जाईल


सम्बन्धित सामग्री