Friday, July 05, 2024 03:19:28 AM

मुंबई पालिकेच्या जल विभागाची फसवेगिरी समोर

मुंबई पालिकेच्या जल विभागाची फसवेगिरी समोर

मुंबई, ०४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाने जलवाहिन्या दुरुस्तीच्या नावाखाली पाणी कपात करणार म्हणून तीन ते चार दिवसांपूर्वी जाहीर केलं, पाणी कपात केले नाही. तर पाणी पूर्णपणे बंद केले. त्यामुळे घाटकोपर एन विभागातील हद्दीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत.

पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी, आंघोळीसाठी आणि शौचालयासाठी देखील पाणी नाही. जल विभागाने नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. आज त्यांनी पिण्याच्या पाण्याची टँकर व्यवस्था केली असता एक टँकरच्या मागे हजारो नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत. जल विभागाने तातडीने पाणी सुरळीत चालू केलं नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट अमोल मातेले यांनी जल विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल असा इशारा दिला.


सम्बन्धित सामग्री