Friday, July 05, 2024 10:57:41 PM

मुंबईतील चेंबूर परिसरात सिलेंडरचा स्फोट

मुंबईतील चेंबूर परिसरात सिलेंडरचा स्फोट

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईतील चेंबूर परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. स्फोटामुळे घराचा काही भाग पडला आहे. बुधवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. सूत्रांनुसार या दुर्घटनेत ४ जण जखमी झाल्याचे समजले आहे. जखमींना लगेचचं गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ११ जणांची सुटका करण्यात आली आहे.

जखमींची नावे -

विकास अंभोरे (पुरुष - ५० वर्ष)
अशोक अंभोरे (पुरुष - २७ वर्ष)
सविता अंभोरे (महिला - ४७ वर्ष)
रोहित अंभोरे (पुरुष - २९ वर्ष)


सम्बन्धित सामग्री