Sunday, October 06, 2024 03:47:06 AM

दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिक आजही रांगेत

दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिक आजही रांगेत

मुंबई, ०८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून माघारी घेण्याची घोषणा केली होती. यानंतर लोकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी सांगण्यात आले होते. सप्टेंबरपर्यंत एकूण ९३% नोटा बँकिंग व्यवस्था दाखल झाल्या आहेत. नोटा परत करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतचा अवधी लोकांना देण्यात आला होता. मात्र एक महिना उलटून गेला असला तरीही काही नागरिकांनी अजून २००० रुपयांच्या नोटा परत केलेल्या नाही. बुधवारी मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाबाहेर २००० रुपयांच्या नोटा परत करण्यासाठी नागरिकांची मोठी रांग लागली होती.

https://youtu.be/baBbtzqgxqw


सम्बन्धित सामग्री