Sunday, July 07, 2024 08:41:54 PM

रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

मुंबई, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाणून घेऊन प्रवासाचे नियोजन करणे हिताचे.

मध्य रेल्वे - मुख्य मार्ग - माटुंगा ते भायखळा - जाणारा - येणारा मार्ग - शनिवारी मध्यरात्री १२.३५ ते रविवारी पहाटे ४.३५

ब्लॉक काळात माटुंगा ते भायखळादरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार. मेल आणि एक्स्प्रेसना दादर फलाट क्रमांक एकवर दोन वेळा थांबा दिला जाईल.

मध्य रेल्वे - हार्बर मार्ग - कुर्ला ते वाशी - जाणारा - येणारा मार्ग - रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० सीएसएमटी ते पनवेल / बेलापूरदरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावरील फेऱ्या रद्द. सीएसएमटी ते कुर्लादरम्यान विशेष फेऱ्या. ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान फेऱ्या सुरू राहणार.

विद्याविहार रेल्वे स्थानकावर महापालिकेकडून रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. पुलाची तुळई (गर्डर) उभारण्यासाठी शनिवारी मध्यरात्री १.१० ते रविवारी पहाटे ४.२० पर्यंत सर्व सहा मार्गांवर ब्लॉक आहे. यामुळे लोकल, मेल आणि एक्सप्रेस विलंबाने धावतील. लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे रेल्वे स्थानकात थांबतील.

सीएसएमटी - ठाणे - शनिवारी रात्री ११.४७ - रद्द
ठाणे - सीएसएमटी - रविवारी पहाटे ४ आणि पहाटे ४.१६ - रद्द
कर्जत - सीएसएमटी - रविवारी मध्यरात्री २.३३ - ठाणे ते सीएसएमटी दरम्यान रद्द
सीएसएमटी - अंबरनाथ - रविवारी पहाटे ५.१६ - सीएसएमटी ते ठाणे रद्द, ठाण्याहून अंबरनाथपर्यंत धावणार

भुवनेश्वर - सीएसएमटी, शालिमार - एलटीटी, हावडा - सीएसएमटी, ठाणे - दादर स्थानकात थांबवण्यात येणार
विशाखापट्टणम - एलटीटी, मंगळुरू - सीएसएमटी, गोरखपूर - एलटीटी, हैद्रराबाद - सीएसएमटी, गदग - सीएसएमटी सुमारे ३० मिनिटे विलंबाने गंतव्य स्थानी पोहोचणार.

        

सम्बन्धित सामग्री