Saturday, July 06, 2024 11:55:21 PM

मुंबईतील रस्ते पालिका धुणार

मुंबईतील रस्ते पालिका धुणार

मुंबई, ०४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: हवेतील प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासन चांगलंच सतर्क झालंय. यानंतर मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते पाण्याने धुण्याचा निर्णय आता महापालिका प्रशासनाने घेतला आहे. धूळ नियंत्रणासाठी १२१ टँकरसह इतर संयंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे फूटपाथ स्वच्छ करून ते पाण्याने धुण्यास सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा यामध्ये प्रामुख्याने वापर केला जाणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही. तसेच वारंवार होणारं हवेचं प्रदुषण आणि धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.


सम्बन्धित सामग्री