Tuesday, July 02, 2024 08:42:30 AM

'बेस्ट'चा बेस्ट निर्णय

बेस्टचा बेस्ट निर्णय

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : हवेची ढासळलेली गुणवत्ता, बांधकामांची धूळ, वाहनांचे प्रदूषण यामुळे मुंबईतील हवा चिंताजनक स्थितीत असताना, त्यातून बाहेर पडण्यासाठी 'बेस्ट'ने आपल्या गाड्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'बेस्ट' बसमधील धुरातील विषारी आणि हानीकारक द्रव्यांचे शुद्धीकरण करून मगच बाहेर फेकणारे मशीन बसवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३५० बसमध्ये अशा मशीन बसवण्यात येतील. तसेच आगामी काळात 'बेस्ट'च्या ताफ्यात येणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवली जाणार आहे.


सम्बन्धित सामग्री