Monday, July 08, 2024 01:52:03 AM

पश्चिम रेल्वेवर दहा दिवसांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर दहा दिवसांचा ब्लॉक

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावर दहा दिवसांचा विशेष ब्लॉक सुरू आहे. वांद्रे ते गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्याकरिता हा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक असल्यामुळे दहा दिवसांच्या कालावधीत एकूण दोन हजार ५२५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. हा ब्लॉक सोमवार ६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ब्लॉक काळापुरत्या ४३ लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय १८८ एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास मार्ग बदलण्यात आला आहे.

चर्चगेट ते विरार दरम्यान रेल्वे वाहतुकीवर होणार परिणाम

२७ - २८ ऑक्टोबर : १२८ लोकल फेऱ्या रद्द
२९ ऑक्टोबर : ११६ लोकल फेऱ्या रद्द
३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर : १५८ लोकल फेऱ्या रद्द
४ नोव्हेंबर : ४६ लोकल फेऱ्या रद्द
५ नोव्हेंबर : ५४ लोकल फेऱ्या रद्द

विरार ते चर्चगेट दरम्यान रेल्वे वाहतुकीवर होणार परिणाम

२७ - २८ ऑक्टोबर : १२७ लोकल फेऱ्या रद्द
२९ ऑक्टोबर : ११४ लोकल फेऱ्या रद्द
३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर : १५८ लोकल फेऱ्या रद्द
४ नोव्हेंबर : ४७ लोकल फेऱ्या रद्द
५ नोव्हेंबर : ५६ लोकल फेऱ्या रद्द

              

सम्बन्धित सामग्री