Monday, July 08, 2024 01:34:38 AM

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : टिटवाळा ते कसारादरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी शनिवारी-रविवारी मध्यरात्री मध्य रेल्वेने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत पाच लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच १६ मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी शेवटची कसारा लोकल शनिवारी रात्री साडेनऊ वाजता रवाना होणार आहे.

गाडी क्रमांक १२१०६ गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस गोंदियावरून तीन तास विलंबाने धावणार आहे. ब्लॉकमुळे अमरावती, देवगिरी, मंगला, पंजाबमेल, नागपूर दुरांतो पाटलीपुत्र, अमृतसर, हातिया, महानगरी, कुशीनगर, शालीमार, हावडा, नंदीग्राम, छपरा आणि बलिया एक्स्प्रेस विविध रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत.

टिटवाळा ते कसारा
शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ५.३० ब्लॉक

कामं होणार

१. कसारा पादचारी पुलासाठी एन आकाराच्या गर्डरची उभारणी
२. उंबरमाळी ते कसारादरम्यान दोन ठिकाणी पुलाचे गर्डर उभारणे
३. आसनगाव ते आटगावदरम्यान रेल्वे फाटकावरील पुलाचे गर्डर उभारणे
४. खडवली ते वाशिंददरम्यान सिग्नल संबंधित यांत्रिक कामे करणे

शनिवारी - रविवारी रद्द केलेल्या लोकल

सीएसएमटी ते कसारा रात्री १०.५०
सीएसएमटी ते कसारा रात्री १२.१५

रविवारी रद्द केलेल्या लोकल

कल्याण ते आसनगाव पहाटे ५.२८
कसारा ते सीएसएमटी पहाटे ३.५१
कसारा ते सीएसएमटी पहाटे ४.५९

शनिवारी शेवटची लोकल

सीएसएमटी ते कसारा रात्री ९.३२
कल्याण ते कसारा रात्री ११.०३
कसारा ते कल्याण रात्री १०.००

रविवारी पहिली लोकल

कल्याण ते कसारा पहाटे ५.४८
कसारा ते कल्याण सकाळी ६.१०

              

सम्बन्धित सामग्री