Sunday, October 06, 2024 03:08:18 AM

सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी

सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा प्रभाव राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर पडण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव गट या दोघांच्या युवा सेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आधी सिनेट निवडणुकीवर शिवसेनेच्या युवा सेनेने बहिष्कार टाकला होता तर उद्धव गटाच्या युवा सेनेने मतदार नोंदणी केली होती. आता सर्वांनाच नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिवसेनेची युवा सेना, उद्धव गटाची युवा सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, छात्र भारती यांच्यासह इतर विद्यार्थी संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

  

सम्बन्धित सामग्री