Tuesday, July 09, 2024 01:45:35 AM

उद्धव यांचा हवेत गोळीबार

उद्धव यांचा हवेत गोळीबार

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव शिवसेना पक्षप्रमुख असताना ललित पाटील नाशिक शहर अध्यक्ष होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांनी उद्धव यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उद्धव यांनी ललित पाटील संदर्भातल्या प्रश्नांना खुबीने टाळले. 'ललित पाटील जर शिवसेनेचे नाशिक शहर अध्यक्ष असतील तर बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्या सारखं आहे' असे वक्तव्य उद्धव यांनी केले. पण फडणवीस यांनी ललित बाबत दिलेली माहिती खरी की खोटी हे सांगणे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव यांनी टाळले.

याआधी ललितला उद्धव यांनी शिवबंधन बांधल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संजय राऊत यांच्यावरही शिवसेना आमदारांनी टीका केली.

सराफावर पोलिसांची पाळत

ललित पाटीलने ससूनमधून फरार झाल्यानंतर एका सराफाकडून आठ किलो सोने खरेदी केले होते. यापैकी तीन किलो सोने पोलिसांनी जप्त केले आहे. बाकीचे पाच किलो सोने शोधण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. ललितची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी ललितसोबत सोन्याचा व्यवहार करणाऱ्या सराफावर पाळत ठेवली आहे.

रेहान शेख अन्सारी पुणे पोलिसांच्या ताब्यात

ड्रग्ज प्रकरणात रेहान शेख अन्सारी पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. कारखाना उभारण्यासाठी रेहानने ललित पाटील याला मदत केली होती. न्यायदंडाधिकाऱ्यांनी रेहानला सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

        

सम्बन्धित सामग्री