Saturday, July 06, 2024 11:20:47 PM

मुंबई उपनगरातील नागरिकांचा प्रवास होणार गारेगार

मुंबई उपनगरातील नागरिकांचा प्रवास होणार गारेगार

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बेस्ट उपक्रमाने २०० वातानुकूलित डबल डेकर बसचे कंत्राट दिले आहे. यापैकी ३९ बस आतापर्यंत बेस्ट उपक्रमाला मिळाल्या आहेत. उर्वरीत बस मार्च २०२४ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. बेस्ट उपक्रम मुंबईतील १२ आगारांमधून वातानुकूलित डबल डेकर बसची सेवा देणार आहे.

सध्या दक्षिण मुंबईत वातानुकूलित डबल डेकर बस धावत आहेत. आता कुर्ला ते वांद्रे - कुर्ला संकुल मार्गावर एकोणीस वातानुकूलित डबल डेकर बस धावणार आहेत. यापैकी दहा वातानुकूलित डबल डेकर बस लवकरच प्रवाशांना सेवा पुरवणार आहेत.

बस क्रमांक ३१० कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे - कुर्ला संकुल मार्गावर तसेच बस क्रमांक ३१३ कुर्ला रेल्वे स्थानक ते सांताक्रूझ रेल्वे स्थानक अशी धावणार आहे. मुंबई उपनगरातील वातानुकूलित डबल डेकर बसच्या इतर मार्गांविषयी लवकरच घोषणा केली जाईल.

बेस्टच्या ताफ्यात २९५२ बस

सध्या बेस्टच्या ताफ्यात २९५२ बस आहेत. याआधी २०२२ मध्ये बेस्टच्या ताफ्यात ३६३८ बस होत्या. यापैकी अनेक बस कार्यकाळ संपल्यामुळे सेवामुक्त करण्यात आल्या आहेत. आर्थिक डोलारा सावरण्यासाठी मध्यंतरीच्या काळात ताफ्यातील बसची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत. मात्र ही परिस्थिती सुधारण्यासाठी बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी विचार करत आहेत.

           

सम्बन्धित सामग्री