Friday, September 20, 2024 02:30:05 AM

विधीमंडळ पाठवणार नोटीस

विधीमंडळ पाठवणार नोटीस

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे. आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना विधीमंडळ आज नोटीस पाठवणार असल्याची माहिती विधीमंडळ सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन वर्ष लोटले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अद्यापही प्रत्यक्षात समोरासमोर आलेले नाहीत. ते समोरासमोर आल्यानंतर परस्परांशी काय बोलतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. आता दोन्ही नेत्यांना पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर येऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे. पुरावे सादर करताना शिंदे आणि ठाकरे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. जुलै २०२२ मध्ये नेमकी शिवसेनेची सुत्रे कोणाच्या हातात होती? हे तपासले जाणार आहे.


सम्बन्धित सामग्री