Tuesday, July 02, 2024 11:57:37 PM

बाप्पाच्या विसर्जनानिमित्त लोकलच्या १८ विशेष फेऱ्या

बाप्पाच्या विसर्जनानिमित्त लोकलच्या १८ विशेष फेऱ्या

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी चौपाटीवर येणाऱ्या गणरायांचे देखणे रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविक गर्दी करतात. या भाविकांची रात्री उशिरानंतर गैरसोय होऊ नये म्हणून यंदा मुंबई लोकलवर १८ विशेष फेऱ्या धावणार आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटेपर्यंत मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.

मध्य रेल्वे

सीएसएमटी ते कल्याण : मध्यरात्री १.४० आणि ३.२५

सीएसएमटी ते ठाणे : मध्यरात्री २.३०

कल्याण ते सीएसएमटी : मध्यरात्री १२.०५

ठाणे ते सीएसएमटी : मध्यरात्री १.०० आणि २.००

हार्बर रेल्वे

सीएसएमटी ते बेलापूर : मध्यरात्री १.३० आणि २.४५

बेलापूर ते सीएसएमटी : मध्यरात्री १.१५ आणि २.४५

पश्चिम रेल्वे

चर्चगेट ते विरार : मध्यरात्री १.१५, १.५५, २.२५ आणि ३.२०

विरार ते चर्चगेट : मध्यरात्री १२.१५, १२.४५, १.४० आणि ३.००

चर्नी रोड स्थानकाबाबत उपाययोजना

२८ सप्टेंबरला सायंकाळी ५ ते रात्री ८.३० दरम्यान धावणाऱ्या सर्व जलद लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. चर्नी रोड स्थानकातील गर्दी नियोजनासाठी सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत फलाट क्रमांक दोनवर धीमी लोकल थांबणार नाही, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


सम्बन्धित सामग्री