Friday, July 05, 2024 03:10:05 AM

मुंबईतील धनगर आरक्षणाची बैठक निष्फळ

मुंबईतील धनगर आरक्षणाची बैठक निष्फळ

मुंबई, २१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत झालेली धनगर आरक्षणाची बैठक निष्फळ ठरली. सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण आहे. पण धनगर समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गामधून आरक्षण हवे आहे. आरक्षणाच्या या मागणीसाठी सुरेश बंडगर नगरच्या चौंडी येथे उपोषण करत आहेत. हे उपोषण मागे घेतले जावे यासाठी राज्य शासनाने गुरुवारी मुंबईत धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. ही चर्चा निष्फळ ठरली.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1704861364303613970

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1704861095478034477

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1704860363198697962

कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाबाबतचा निर्णय घेण्यासाठी आणखी काही दिवसांची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या बाजू तपासून घ्याव्या लागतील, असे राज्य शासनाने धनगर समाजाच्या प्रतिनिधींना सांगितले. यानंतर धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी निर्णय होईपर्यंत उपोषण सुरू राहील, असे सांगितले.

महत्त्वाचे

१. सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण
२. धनगर समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गामधून आरक्षण हवे आहे
३. अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये R ऐवजी D असा शब्द वापरला
४. 'ड' ऐवजी 'र' असा उल्लेख आल्याने समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा धनगर समाजाचा दावा
५. धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान असल्याचा धनगर समाजाचा दावा
६. महाराष्ट्रात धनगड समाजाचे नाही पण धनगर समाजाचे नागरिक आहेत


सम्बन्धित सामग्री