Sunday, October 06, 2024 02:29:10 AM

खिचडी घोटाळ्याची चौकशी होणार

खिचडी घोटाळ्याची चौकशी होणार

मुंबई, २० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांची चौकशी होणार आहे. अमोल किर्तीकर उद्धव गटात आहेत. ते उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उद्धव गटाचे उमेदवार आहेत.

मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने खिचडी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लवकरच अमोल किर्तीकर यांची चौकशी होणार आहे. याआधी मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने शव पिशवी अर्थात बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लागोपाठ दोन प्रकरणांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे उद्धव गटाची कोंडी होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भ्रष्टाचार प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा केटरर्सचे भागीदार, मुंबई महापालिकेचे निवडक अधिकारी आणि या प्रकरणाशी संबंधित इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या किरीट सोमय्या यांनी पहिल्यांदा खिचडी घोटाळा आणि शव पिशवी अर्थात बॉडी बॅग घोटाळा प्रकाशात आणला. या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.

                    

सम्बन्धित सामग्री