Tuesday, July 09, 2024 02:00:21 AM

मुंबईत उत्सवरंग, गणरायाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज; घरोघरी चैतन्य

मुंबईत उत्सवरंग गणरायाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज घरोघरी चैतन्य

मुंबई, १९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: सजावटीच्या सामानापासून खाऊपर्यंत आणि पत्री-फुलांपासून सोन्याचांदीच्या गणपतीच्या दागिन्यांपर्यंत मनासारखी खरेदी झाल्यानंतर गणेशभक्त गणेश आगमनासाठी सज्ज झाले आहेत. शनिवार-रविवारी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती मंडपांमध्ये विराजमान झाल्यानंतर सोमवारी दुपारनंतर घरोघरी गणेश आगमनाचीही लगबग सुरू झाली.

अनेक घरांमध्ये मंगळवारी गणेश चतुर्थीलाच गणेशमूर्ती आणण्यात येईल. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी असल्याने गल्लोगल्ली सुरू असलेल्या गणेश मूर्तीच्या मंडपांमध्ये झुंबड उडालेली होती. मंगळवारी दुपारपर्यंत गणेश चित्रशाळांमधील गर्दी कायम राहील. सार्वजनिक गणपतीबरोबरच घरगुती गणपती आगमनही ढोलताशांच्या गजरात करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढताना दिसत आहे. याचाच प्रत्यय सोमवारीही ठिकठिकाणी आला. इमारतींमधील गणपतींच्या आगमनाचा एकत्र सोहळा साजरा करतानाही ढोलताशाच्या पथकांना निमंत्रण दिले जात आहे. त्यातच गुजरातीबहुल भागामध्ये सजवलेल्या इलेक्ट्रिक रथातूनही गणेशमूर्तींचे आगमन होत होते. लेझीमच्या तालात विद्यार्थ्यांनी आगमनाचा उत्साह वाढवला. यंदा शाळा, कॉलेजांमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. तेधूनही सजवलेल्या, रंगवलेल्या मूर्ती विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी नेल्या.


सम्बन्धित सामग्री


आली गवर आली..!

आली गवर आली..!