Tuesday, July 09, 2024 01:30:09 AM

बाप्पाला सजवण्यासाठी ६९ किलो सोनं आणि ३३६ किलो चांदी

बाप्पाला सजवण्यासाठी ६९ किलो सोनं आणि ३३६ किलो चांदी

मुंबई, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मंगळवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईच्या गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाची मूर्ती सजवण्यासाठी ६९ किलो सोनं आणि ३३६ किलो चांदी वापरली आहे. चांद्रयान - ३ चे यश साजरे करण्यासाठी गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ गणेश चतुर्थीच्या दिवशी यज्ञ करणार आहे. राम मंदिराचे कामकाज विनाअडथळा वेळेत पूर्ण व्हावे यासाठी बुधवारी २० सप्टेंबर रोजी गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ यज्ञ करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळाने गणेशोत्सवासाठी विमा काढला आहे. यंदाचा विमा हा ३६०.४५ कोटी रुपयांचा आहे. मंडपातील पाहुण्यांना २९० कोटी रुपयांचे विमा संरक्षण मिळाले आहे. बाप्पाच्या दागिन्यांसाठी ३९ कोटींचे तर सार्वजनिक जबाबदाऱ्यांसाठी २० कोटींचे विमा संरक्षण आहे. मंडळाने संरक्षणासाठी म्हणून उच्च दर्जाचे चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मंडपाच्या आवारात ठिकठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यंदाचा गणेशोत्सव मंगळवार १९ सप्टेंबरपासून शुक्रवार २९ सप्टेंबरपर्यंत आहेत. या काळात सुरक्षित आणि आनंदी वातावरणात सोहळा साजरा केला जाईल, असे गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळाने सांगितले.

  

सम्बन्धित सामग्री