Sunday, July 07, 2024 09:11:54 PM

हार्बर मार्गावर पुढील २२ दिवस मेगाब्लॉक! काही लोकल फेऱ्या रद्द

हार्बर मार्गावर पुढील २२ दिवस मेगाब्लॉक काही लोकल फेऱ्या रद्द

मुंबई, ११ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकावर समर्पित फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी २ ऑक्टोबरपर्यत रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक आणखी २२ दिवस चालणार आहे. यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील रात्री उशिरा धावणाऱ्या आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

ग्रेटर नोएडातील दादरीपासून ते मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी सर्वत्र रेल्वे मार्गिका टाकण्याचा प्रकल्प डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन लिमिटेडने हाती घेतला आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून दोन नवीन ट्र्क पनवेल स्टेशन यार्डमधून जाण्याचे नियोजित आहे.

त्याचाच एक भाग म्हणून पनवेल ईएमयू उपनगरीय स्टॅबलिंग लाईन्समध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासाठी १८ ऑगस्ट २०२३ पासून दररोज तीन ते चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येत आहे. जवळपास ४५ दिवस काम सुरू असणार आहे. याकरिता ११ सप्टेंबरपासून ब्लॉक रात्री साडे बारा ते पहाटे साडे पाच वाजेपर्यत घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वाहतुकीत मोठे बदल केले आहे.

स्थानक : पनवेल यार्ड वेळ : रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत, कालावधी : ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर

शेवटची लोकल
रात्री १०.५८ : सीएसएमटी-पनवेल
रात्री ११.३२ : ठाणे-पनवेल
रात्री १०.१५ : पनवेल-ठाणे

पहिली लोकल
सकाळी ४.३२ : सीएसएमटी-पनवेल
सकाळी ५.४० : पनवेल-सीएसएमटी
सकाळी ६.२० : ठाणे-पनवेल
सकाळी ६.१३ : पनवेल-ठाणे

रद्द लोकल फेऱ्या
सीएसएमटी-पनवेल : रात्री ११.१४, १२.२४, पहाटे ५.१८, सकाळी ६.४०
पनवेल-सीएसएमटी : रात्री ९.५२, १०.५८, पहाटे ४.०३, ५.३१
ठाणे-पनवेल-नेरुळ : रात्री ९.३६, १२.०५, पहाटे ५.१२, ५.४०
पनवेल-ठाणे : रात्री ११.१८, पहाटे ४.३३, ४.५३

अंशत: रद्द
रात्री : ११.३०, ११.५२, १२,१३,१२.४० सीएसएमटी-पनवेल लोकल बेलापूरपर्यंत धावतील आणि तेथूनच सीएसएमटीकडे रवाना होतील.
रात्री : १२.५० वडाळा-बेलापूर लोकल वाशीपर्यंत धावणार आहे.


सम्बन्धित सामग्री