Sunday, July 07, 2024 09:40:18 PM

मुंबईतील समुद्रकिनारे होणार दुर्गंधीमुक्त

मुंबईतील समुद्रकिनारे होणार दुर्गंधीमुक्त

मुंबई, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: चौपाट्यांवर येणाऱ्या पर्यटकांची शौचालयाअभावी मोठी गैरसोय होते. पर्यटक कुठेही शौच किंवा लघवी करतात. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर दुर्गंधी पसरते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने विविध चौपाट्यांवर मिळून २४ फिरती शौचालये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३ कोटी ४२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

ही शौचालये सशुल्क असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती पालिकेच्या परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. दिव्यांग, वृद्ध, गर्भवती महिलांसाठी शौचालये बांधताना त्यांचा तळ जमिनीपासून फार उंच असणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. विजेची बचत करण्यासाठी दोन किलो वॉटचे सौरऊर्जा पॅनल शौचालयांवर बसवण्यात येणार आहेत. ही शौचालये खासगी संस्थेस चालविण्यास देण्यात येणार आहेत. शौचालयांना जलजोडण्या देणे शक्य होणार नसल्याने प्रत्येक शौचालयात एक हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात येणार आहेत. पाणी उपलब्ध करणे संबंधित संस्थेस बंधनकारक असणार आहे.

या ठिकाणी शौचालये

गिरगाव २

दादर २

वर्सोवा ४

जुहू ८

अक्सा ४

गोराई ४

        

सम्बन्धित सामग्री