Monday, September 09, 2024 04:10:43 PM

मुंबईत 'एवढा' पाणीसाठा

मुंबईत एवढा पाणीसाठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या जलाशयांमध्ये मिळून एकूण ९४ टक्के पाणीसाठा आहे. याआधी ८ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईच्या जलाशयांमध्ये ९८ टक्के पाणीसाठा होता. मागच्या वर्षी तुलनेत यंदा ४ टक्के कमी पाणीसाठा आहे.

मुंबईची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढी आहे. सध्या मुंबईच्या जलाशयांमध्ये १३ लाख ४८ हजार ४४९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

जलाशय : सध्याचा पाणीसाठा : पाणीसाठ्याची क्षमता : टक्केवारीच्या स्वरुपात सध्याचा पाणीसाठा
१. अप्पर वैतरणा : १ लाख ८४ हजार ९३६ दशलक्ष लिटर : २ लाख २७ हजार ४७ दशलक्ष लिटर : ८१ टक्के
२. मोडकसागर : १ लाख २२ हजार ३२९ दशलक्ष लिटर : १ लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर : ९४ टक्के
३. तानसा : १ लाख ४५ हजार ८० दशलक्ष लिटर : १ लाख ४५ हजार ८० दशलक्ष लिटर : १०० टक्के
४. मध्य वैतरणा : १ लाख ९० हजार ७९७ दशलक्ष लिटर : १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर : ९८ टक्के
५. भातसा : ६ लाख ६९ हजार ५७३ दशलक्ष लिटर : ७ लाख १७ हजार ३७ दशलक्ष लिटर : ९३ टक्के
६. विहार : २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर : २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर : १०० टक्के
७. तुळशी : ८ हजार ४६ दशलक्ष लिटर : ८ हजार ४६ दशलक्ष लिटर : १०० टक्के


सम्बन्धित सामग्री