Sunday, June 30, 2024 08:59:04 AM

हवाई सुंदरीचा जीव घेणाऱ्या सफाई कामगाराची आत्महत्या

हवाई सुंदरीचा जीव घेणाऱ्या सफाई कामगाराची आत्महत्या

मुंबई, ८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबईतील पवई भागात एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीने तुरुंगामध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या पोलीस स्टेशनच्या तुरुंगामध्येच गळफास घेत त्याने आयुष्य संपवलं. पवई येथे राहणाऱ्या रुपल आग्रे नावाच्या ट्रेनी हवाई सुंदरीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रम अटवाल याला अटक केली होती.

आरोपी विक्रम अटवाल याने पँटचा सहाय्याने गळफास लावून घेतला. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. सफाई कामगार असलेल्या विक्रमने दोन दिवसांपूर्वी रुपल आग्रे हिची गळा चिरुन हत्या केली होती.

पवई येथे राहणाऱ्या रुपल आग्रे नावाच्या हवाई सुंदरीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रमला अटक केली होती. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर आठ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आज सकाळीच त्याने आपल्या पँटने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.


सम्बन्धित सामग्री