Monday, July 08, 2024 01:10:00 AM

मुंबईतील टीसींनी फुकट्या प्रवाशांकडून वसूल केले १०९कोटी

मुंबईतील टीसींनी फुकट्या प्रवाशांकडून वसूल केले १०९कोटी

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १०९ कोटी रुपयांच्या दंड वसूल केला आहे. या वर्षी तिकीट तपासणीतून मिळालेला महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १० टक्के जास्त असल्याने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा गौरव मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

तिकीट तपासणीसांच्या गौरव कार्यक्रमात रजनीश कुमार गोयल यांनी मुंबई विभागाच्या महसुलात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ६७ स्टेशन प्रभारी आणि २८ फ्लाइंग स्क्वॉड इन्चार्ज (इन्चार्ज) आणि त्यांच्या पथकांच्या सत्कार केला. यावेळी गोयल यांनी १०० कोटींहून अधिक महसूल मिळवून दिल्याबद्दल मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीचे कौतुक केले. प्रवाशांचे प्राण वाचवणे, अल्पवयीन मुलांचे रक्षण करणे आणि प्रवाशांची मौल्यवान मालमत्ता परत करणे यासारखी उल्लेखनीय उदाहरणे देऊन त्यांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १०९ कोटी रुपयांच्या दंड वसूल केला आहे.

तिकीट तपासणीसांच्या गौरव कार्यक्रमात अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) अखलाक अहमद,आणि वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रॉबिन कालिया, यांनी देखील मुंबई विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.


सम्बन्धित सामग्री