Saturday, October 05, 2024 05:07:19 PM

agriculture-minister-dhananjay-mundes-visit-to-delhi
कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा दिल्ली दौरा

कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा दिल्ली दौरा

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने निर्यातीच्या कांद्यावर ४० टक्के कर लागू केला आहे. या ४० टक्क्यांच्या निर्यात शुल्काला व्यापारी संघटनांकडून विरोध सुरू आहे. केंद्राच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी व्यापारी संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. या वातावरणात महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. ते दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत. https://youtu.be/PgkFjimqi2M ठिकठिकाणी व्यापारी संघटना केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलनं करत आहेत. कांद्याचे लिलाव ठप्प असल्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प आहे. जेएनपीटी बंदरात निर्यातीसाठी आलेला कांदा पडून आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा कांदा सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे गडगडण्यास सुरुवात झाली आहे. घाऊक बाजारात कांद्याचे भाव १८ ते २२ रुपये किलो झाला आहे. एकीकडे कांद्याची उलाढाल ठप्प झाल्यामुळे आणि निर्यातीचा कांदा अडकून पडल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसरीकडे भाव गडगडल्यामुळे कांदा किरकोळ दराने उपलब्ध आहे. या टोकाच्या परिस्थितीतून मार्ग काढणे तसेच शेतकरी आणि कृषी उत्पन्नाचा व्यापार करणारे व्यापारी यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे दिल्लीत गोयल यांची भेट घेणार आहेत.


सम्बन्धित सामग्री