Thursday, July 04, 2024 09:06:20 AM

sanjay-raut-will-contest-the-lok-sabha-elections-from-north-east-mumbai
संजय राऊत ईशान्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवणार?

संजय राऊत ईशान्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवणार

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत २०२३ च्या लोकसभेसाठी ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहणार असल्याची चर्चा आहे. सध्या संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत. पण त्यांच्यावर लोकसभा खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी केल्याचा आरोप आहे. तसेच संजय राऊत यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेचा अवमान केल्याचेही एक प्रकरण प्रलंबित आहे. या दोन पैकी एका प्रकरणात जरी संजय राऊत दोषी आढळले तरी त्यांची खासदारकी रद्द होण्याचा धोका आहे. जर खासदारकी रद्द झाली तर संजय राऊत यांच्याकडे लोकसभेची निवडणूक लढवणे हा एक पर्याय आहे. पक्षाने आदेश दिला तर लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार आहे, असे अलिकडेच राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. पण २०२३ च्या निवडणुकीत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आमचा विजय होईल, असे संजय राऊत म्हणाले. याच कारणामुळे संजय राऊत २०२३ च्या लोकसभेसाठी ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उभे असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री