Tuesday, July 02, 2024 11:28:26 PM

central-railway-traffic-disrupted-3
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज उपनगरामध्ये सगळीकडे पाणी साचले आहे. अंबरनाथमध्ये रेल्वे रुळावर पाणी आल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. कामावर जाण्याच्या वेळेतच रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.

मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडीचं इंजिन बिघडल्यामुळे खोळंबा झाला आहे. बिघडलेलं इंजिन बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल. मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडीचं इंजिन कर्जतमध्ये खराब झाल्यामुळे हा खोळंबा झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे.


सम्बन्धित सामग्री